मौजे पुस्तक संच 1 १.कुंपणाच्या आत कोंबडा ओरडला दोन कोंबड्यांमध्ये मध्ये लागलेली झुंज आणि शेणारी किडे टिपत असेलेल्या कोंबड्या याच्या आसपास गुंफलेली मजेदार गोष्ट. २.कुरडया करू कुरड्या कश्या कराव्यात यावर पाककृतीचे अनेक पुस्तके आहेत. पण कुरडया बनविताना काय गम्मत असते. मुलांनी किती मजा येते. चिंगी आणि तिची आई मिळून कुरडया बनवतात. वाचा बरं काय पुडे गम्मत होते. ३. एवढ्याश्या बॉक्स मध्ये ऐवढ फॅन घरात येण्याऱ्या सर्वच गोष्टी बॉक्समध्ये येतात. पण एवढ्याश्या बॉक्स मध्ये एवढा मोठ्ठा फॅन कसा काय मावला असेल बरं. ४. हिरव्या गार पाण्यामध्ये काळ्याशार म्हशी पाण्यामध्ये डुंबनाऱ्या म्हशी आणि त्यांच्या आसपास फिरणारा बगळा, काय करतो बघा. ही पुस्तके आपल्या परिसरात छोट्या मोठ्या घटना मध्ये दडलेली गम्मत जम्मत कथा स्वरूपात घेवून आपल्यासाठी घेवून येतात __________________________________________________________________________________________________ दवात ए दक्कन मार्फत निर्माण होणारी सर्व पुस्तके ही पालक आणि मुले हा बंध समृद्ध व्हावा आणि संवाद वाढीस लागावा हे उद्देश समोर ठेवून बनवलेली आहेत. पालक वाचनात सहभागी असतील हे गृहीत धरून ही पुस्तके निर्माण केलेली आहेत. त्यामुळे शब्दांच्या काठीण्य पातळीचा मुद्दा महत्वाचा न करता गोष्ट, माहिती आणि मनोरंजन हे मुद्दे प्रामुख्याने या पुस्तकांत समोर येतात. ही पुस्तके पालकांनी मुलांसोबत वाचावीत आणि त्यांच्या संवादाला धुमारे फुटावेत, कल्पनेचे इंद्रधनु खुलावे, सृजनात्मकेला वाव मिळावा आणि विचारांना खाद्य मिळावे. मूल बोलते, वाचते, लिहिते आणि स्वतंत्र विचार करते व्हावे हीच आम्हा प्रकाशकांची इच्छा!