या वाघोबाचे प्रेम जडले मोबाईल वर. जंगलाचा राजा आणि आपल्याकडे मोबाईल नाही कसा? वाघोबाला प्रश्न पडलाय फार मोठ्ठा. चला पाहूयात मग या अनोख्या वाघोबा आणि त्याच्या मोबाईलची कहाणी. ________________________________________________________________________________________ दवात ए दक्कन मार्फत निर्माण होणारी सर्व पुस्तके ही पालक आणि मुले हा बंध समृद्ध व्हावा आणि संवाद वाढीस लागावा हे उद्देश समोर ठेवून बनवलेली आहेत. पालक वाचनात सहभागी असतील हे गृहीत धरून ही पुस्तके निर्माण केलेली आहेत. त्यामुळे शब्दांच्या काठीण्य पातळीचा मुद्दा महत्वाचा न करता गोष्ट, माहिती आणि मनोरंजन हे मुद्दे प्रामुख्याने या पुस्तकांत समोर येतात. ही पुस्तके पालकांनी मुलांसोबत वाचावीत आणि त्यांच्या संवादाला धुमारे फुटावेत, कल्पनेचे इंद्रधनु खुलावे, सृजनात्मकेला वाव मिळावा आणि विचारांना खाद्य मिळावे. मूल बोलते, वाचते, लिहिते आणि स्वतंत्र विचार करते व्हावे हीच आम्हा प्रकाशकांची इच्छा!