पडीक जमीन म्हणून ओळख असलेल्या माळावर श्रावण महिन्यात अनेक फुले फुलतात. सहज नजर टाकल्यावर दिसतही नाहीत एवढी लहान. पण नीट लक्ष देऊन पाहिल्यावर अनेक विविध रंगाची आणि आकाराची फुले दिसतात. अश्याच एकद दक्खनच्या माळावरच्या सराडोबाची आणि फुलांची कहाणी. कश्यासाठी बरे बनविलेला असेल सरडोबाने हा गुलदस्ता? _______ दवात ए दक्कन मार्फत निर्माण होणारी सर्व पुस्तके ही पालक आणि मुले हा बंध समृद्ध व्हावा आणि संवाद वाढीस लागावा हे उद्देश समोर ठेवून बनवलेली आहेत. पालक वाचनात सहभागी असतील हे गृहीत धरून ही पुस्तके निर्माण केलेली आहेत. त्यामुळे शब्दांच्या काठीण्य पातळीचा मुद्दा महत्वाचा न करता गोष्ट, माहिती आणि मनोरंजन हे मुद्दे प्रामुख्याने या पुस्तकांत समोर येतात. ही पुस्तके पालकांनी मुलांसोबत वाचावीत आणि त्यांच्या संवादाला धुमारे फुटावेत, कल्पनेचे इंद्रधनु खुलावे, सृजनात्मकेला वाव मिळावा आणि विचारांना खाद्य मिळावे. मूल बोलते, वाचते, लिहिते आणि स्वतंत्र विचार करते व्हावे हीच आम्हा प्रकाशकांची इच्छा!