झुम्कुळा हा मराठी कथासंग्रह वसिमबार्री मणेर यानी लिहिला आहे. वसिमबार्री मणेर हे व्यवसायाने चित्रपट दिग्दर्शक आहेत, त्यांनी होऊ दे जरासा उशीर हा सिनेमा लिहिला व दिग्दर्शित केला आहे. लिखाण हे वसिमबार्री मणेर यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. त्यांनी लिहिल्या सर्वच कथा मासिकातून प्रकाशित होत असतात. एवढच नाही तर बरेच प्रकाशक त्यांच्या दिवाळी अंकासाठी कथा पाठवण्याचा हट्ट धरतात. अश्याच काही प्रकशित कथांचा हा कथासंग्रह तुमच्या भेटीला. १. आंबटचुका २. मल्हारी ३. बैदा ४. आपरेशन ५. झुम्कुळा ६. सुगंधी शुटर ७. फळकुट ८. खारी ९. किल्ला १०. सत्कार ११. घरभरवनी १२. मैमुनाचा मालक